मराठी भाषा सराव टेस्ट क्रमांक २
प्रश्न १ – ‘आज पाऊस पडावा’ -वाकप्रचार ओळखा.
(a) केवल (b) मिश्र (c) संयुक्त (d) गौण
उत्तर – (a) केवल
प्रश्न २ – खालीलपैकी प्रत्ययघटीत शब्द ओळखा.
(a)प्रगती (b)विज्ञान (c) आडनाव (d) भवितव्य
उत्तर – (d) भवितव्य
प्रश्न ३ – विशेषण कशाला म्हणतात?
(a) वस्तू किवा पदार्था विषयी विशेष माहिती देण्यासाठी जो शब्द वापरतात
(b)वाक्यातील शेवटच्या शब्दाला
(c) वाक्यातील विशेष शब्दला (d) या पैकी नाही
उत्तर – (a)
प्रश्न ४ – शब्दाच्या जाती नुसार गटात न बसणारा शब्द कोणता
(a) निरभ्र (b) स्वच्छ (c) पाणी (d) हिरवेगार
उत्तर – (c) पाणी
प्रश्न ५ – वाकडे पाऊल पडणे
(a) वाट चुकणे (b)सरळ न चालणे (c) दुवर्तन करणे (d)भलत्याच ठिकाणी पोचणे
उत्तर – (c) दुवर्तन करणे
प्रश्न ६ – खालील शब्द समुहाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्द निवडा — एखाघा गोष्टीचा मनात केलेला विचार.
(a) संभाषण (b) स्वभाषण (c) चिंतन (d) स्वागत
उत्तर – (c) चिंतन
प्रश्न ७ -दिलेल्या वाक्यातील नामे ओळखा
माणसांप्रमाणे मांजर नक्कीच बोलत नाही
(a)माणसांप्रमाणे ,मांजर (b) बोलत (c) नाही (d) नक्कीच
उत्तर – (a)
प्रश्न ८ – अचूक शब्द कोणता
(a) कुत्रिम (b) कृत्रिम (c) क्रुत्रिम (d) कृतीम
उत्तर – (b) कृत्रिम
प्रश्न ९ – खालीलपैकी उपसर्गघटीत शब्द ओळख.
(a)आजन्म (b) लेखक (c) दाता (d) खोदाई
उत्तर – (a)आजन्म
प्रश्न १० – ‘पाडले’ या शब्द क्रियापदाचा कोणता प्रकार दर्शवतो?
(a) साधित क्रियापद (b) सिद्ध क्रियापद (c) प्रयोजक क्रियापद (d) शक्य क्रियापद
उत्तर – (c) प्रयोजक क्रियापद
प्रश्न ११ -नाम म्हणजे काय ?
(a) नाम हा नामाचा एक प्रकार आहे
(b) फक्त व्यक्तीच्या नावाला नाम म्हतात
(c) व्यक्ती,वस्तू,द्रव किवा प्राण्याच्या नावाला नाम म्हणतात
(d) फक्त प्राण्याच्या नावाला नाम म्हणतात
उत्तर – (c)
प्रश्न १२ – खालील पैकी अशुद्ध शब्दाचा योग्य पर्याय निवडा
(a) कीर्ती (b) गाणि (c) सुगी (d) प्रीती
उत्तर – (b) गाणि
प्रश्न १३ -‘डोळे निवने’ या वाकप्रचाराचा अर्थ सांगा.
(a) बरे वाटणे (b) स्वच्छ दिसणे (c) इच्छा पूर्ण करणे (d) समाधान होणे
उत्तर – (d) समाधान होणे
प्रश्न १४ – व्यंजन कशाला म्हणतात ? खालीलपैकी अचूक पर्याय लिहा.
(a)स्वर नाहीत ते.
(b) ज्यांचा उच्चार करताना अडथळा येत नाही.
(c) जे संकप असतात
(d) ज्यांचा उच्चार करताना अडथळा येतो .
उत्तर – (d)
प्रश्न १५ – योग्य विधेय वापरून वाक्य पूर्ण करा
सिधुदुर्ग चा किल्ला——-
(a) रानात आहे (b) अभेद्य आहे (c) अजरामर (d) पुण्यात आहे
उत्तर – (b) अभेद्य आहे