महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने, महसूल विभागांतर्गत ४३४४ तलाठी पदांसाठी पदभरती साठी जाहिरात प्रकाशित केली आहे. महाराष्ट्र राज्याचे पदवीधर उम्मीदवर २६ जून २०२३ पासून या पदांसाठी अर्ज करता येणार असून, १८ जुलैपर्यंत ही प्रक्रिया सुरु राहणार आहे. या पदभरतीसाठी आवशयक ती सगळी माहिती तुम्हाला या लेखात मिळेल. तलाठी पदभरती बाबत अधिक माहिती ( शिक्षण, वयोमर्यादा, तलाठी परीक्षा स्वरूप, मागील तलाठी पेपर्स आणि तलाठी सर्व पेपर्स साठी www.talathi.co.in या वेब साईट वर visit करत रहा इथे आम्ही तुमच्यासाठी Nagpur Talathi Previous Paper 2013 with answer प्रकाशित करीत आहे
१ दोन स्वर एकत्र येवून तयार होणार्या स्वराला काय म्हणतात ?
(a) र्हस्व स्वर (b) दीर्घ स्वर (c) संयुक्त स्वर (d) अर्ध स्वर
२ खालीलपैकी कोणता वर्ण अर्ध स्वर नव्हे ?
(a) ल् (b) य (c) ए (d) यापैकी नाही
३ म या वर्णाचे स्थान कोणते ?
(a) कंठस्थान (b)तालुस्थान (c) औष्ठ्यस्थान (d) मूर्धस्थान
४ खालीलपैकी कोणता वर्ण दुसर्या वर्णावर स्वार होतो ?
(a) अं (b) अः (c) ग (d) ढ
५ वर्णमालेत एकूण किती कठोर वर्ण आहेत ?
(a) १३ (b) १५ (c) १२ (d) ३४
६ ‘क्षुत्पिपासा’ या शब्दाचा योग्य संधि विग्रह कोणता ?
(a) क्षुधा + पिपासा (b) क्षुद्र + पिपासा (c) क्षुड + पिपासा (d) क्षुत + पिपासा
७ ‘मनश्च्यश्रू’ या शब्दातील संधि स्पष्ट करा.
(a) नम + चक्षु (b) मनस + चक्षु (c) मन + चक्षु (d) मनश + चक्षु
८ खालीलपैकी कोणता प्रकार व्याकरण शास्त्रातील संधी नव्हे ?
(a) विसर्ग संधी (b) नामी संधी (c) स्वर संधी (d) व्यंजन संधी
९ ‘देवालय’ हा शव्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे ?
(a) विसर्ग संधी (b) नामी संधी (c) स्वर संधी (d) व्यंजन संधी
१० ‘सौंदर्य’ या शब्दाचा प्रकार ओळखा.
(a) गुणविशेष (b) भाववाचक नाम (c) शब्दयोगी अव्यय (d) सर्वनाम
Answers –
1 | 2 | 3 | 4 | 5 | 6 | 7 | 8 | 9 | 10 |
c | d | d | c | a | a | c | b | c | b |