महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने, महसूल विभागांतर्गत ४३४४ तलाठी पदांसाठी पदभरती साठी जाहिरात प्रकाशित केली आहे. महाराष्ट्र राज्याचे पदवीधर उम्मीदवर २६ जून २०२३ पासून या पदांसाठी अर्ज करता येणार असून, १८ जुलैपर्यंत ही प्रक्रिया सुरु राहणार आहे. या पदभरतीसाठी आवशयक ती सगळी माहिती तुम्हाला या लेखात मिळेल. तलाठी पदभरती बाबत अधिक माहिती ( शिक्षण, वयोमर्यादा, तलाठी परीक्षा स्वरूप, मागील तलाठी पेपर्स आणि तलाठी सर्व पेपर्स साठी www.talathi.co.in या वेब साईट वर visit करत रहा इथे आम्ही तुमच्यासाठी SataraTalathi Previous Paper 2013 with answer प्रकाशित करीत आहे
१ ‘बाज’ हा प्रत्यय पुढीलभाषेतून मराठीने स्वीकारला आहे.
(a) संस्कृत (b) फारसी (c) हिन्दी (d) यापैकी नाही
उत्तर- (b)
२ ‘वानर’ शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा.
(a) वानरीन (b) वानरी (c) वानरिण (d) यापैकी नाही
उत्तर- (b)
३ ‘एकाचवेळी अनेक गोष्टीत बरोबर लक्ष ठेवणारा’ या शब्द समुहासाठी एक शब्द निवडा.
(a) अष्टावधाणी (b) प्रसांगावधाणी (c) हजरजवाबी (d) यापैकी नाही
उत्तर- (a)
४ ज्याला कर नाही त्याला डर कसली ? या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा.
(a) भावकर्तुक क्रियापदे (b) शब्दयोगी अव्यये (c) स्थलवाचक क्रियाविशेषण (d) धातुसाधित नामे
उत्तर- (d)
५ ‘अस्खलित’ या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणत्या पर्यायाने स्पष्ट केला आहे ?
(a) न थांबता काम करणारा (b) अगदी अस्सल असा (c) आवडणारी गोष्ट (d) आदरणीय असा
उत्तर- (a)
६ ‘भिक्षुकी’ या शब्दाचा प्रकार ओळखा.
(a) शब्दयोगी अव्यय (b) भाववाचक नाम (c) सामान्य नाम (d) कालवाचक नाम
उत्तर- (b)
७ खालील पर्यायापैकी’ सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्यय’ ओळखा.
(a) वारंवार (b) हल्ली (c) दिवसभर (d) क्षणोक्षणी
उत्तर- (c)
८ ‘आईला थोडे बरे नाही बाकी सर्व ठीक’ – या वाक्यातील अधोरेखित शब्द प्रकार ओळखा .
(a) उभयान्वयी अव्यय (b) क्रियाविशेषण (c) साधित क्रियापद (d) सामान्य नाम
उत्तर- (a)
९ खालीलपैकी कोणत्या वाक्यातील क्रियापद हे प्रयोजक क्रियापद म्हणून वापरले आहे ?
(a) मला रोज दोन मैल चालवते (b) आई त्या मुलाला हसवते (c) खेड्यातील माणसे आता बरीच पुढारली (d) ती शेवटी व्यवसायात स्थिरावला
उत्तर- (b)
१० पुढे दिलेल्या शब्दांतून शब्दाचे शुद्ध रूप लिहा.
(a) हस्तसमुद्रीक (b) हस्तसामुद्रिक (c) हस्त्सामुद्रिक (d) हस्तमुद्रिक
उत्तर- (b)
११ पुढे दिलेल्या पर्यायातील कोणता शब्द हा द्वंद्वं समासाचे उदाहरण आहे ?
(a) बटाटेवडा (b) कंबरपट्टा (c) अहिनकुल (d) तोंडपाठ
उत्तर- (c)
१२ ‘मधुने लाडू खाल्ला असेल’ – या वाक्याचा काळ ओळखा.
(a) अपूर्ण भविष्यकाळ (b) पूर्ण वर्तमानकाळ (c) पूर्ण भविष्यकाळ (d) अपूर्ण वर्तमानकाळ
उत्तर- (c)
१३ पेटती ज्योत- यातील अधोरेखित पेटती या शब्दाचा प्रकार ओळखा .
(a) गुणवचक क्रियाविशेषण (b) धातुसाधित नाम (c) स्थलवाचक क्रियाविशेषण (d) धातुसाधित विशेषण
उत्तर- (d)
१४ ‘अडकित्ता’ हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे ?
(a) हिंदी (b) कानडी (c) फारसी (d) गुजराती
उत्तर- (b)
१५ ‘पेशवा’ हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे ?
(a) हिंदी (b) कानडी (c) फारसी (d) गुजराती
उत्तर- (c)
१६ ‘लंबोदर व पीतांबर’ ही खालीलपैकी कोणत्या समासाची उदाहरणे आहेत ?
(a) बहुव्रीहि समास (b) तत्पुरुष समास (c) द्वंद्वं समास (d) यापैकी नाही
उत्तर- (a)
१७ खालीलपैकी कोणता पर्यायाला ‘अव्ययीभाव’ समासाचे उदाहरण होईल ?
(a) बटाटेवडा (b) पंचवटी (c) बेमालूम (d) तोंडपाठ
उत्तर- (c)
१८ ‘शिक्षकांनी विद्यार्थ्याला शिकवावे’ – या वाक्यातील प्रयोग ओळखा.
(a) कर्तरी प्रयोग (b) भावे प्रयोग (c) कर्मणी प्रयोग (d) यापैकी नाही
उत्तर- (b)
१९ ‘भरत म्हणून एक राजा होऊन गेला’ – या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार कोणता ?
(a) कारणबोधक उभयान्वयी अव्यय
(b) स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय
(c) परिणामबोधक उभयान्वयी अव्यय
(d) उपदेशबोधक उभयान्वयी अव्यय
उत्तर- (b)
२० ‘मला फक्त शंभर रुपये हवेत’ – या वाक्यातील फक्त या शब्दाचा प्रकार ओळखा.
(a) सार्वनामिक विशेषण
(b) साधित क्रिया विशेषण
(c) संग्रहवाचक शब्दयोगी अव्यय
(d) केवलप्रयोगी अव्यय
उत्तर- (c)