महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने, महसूल विभागांतर्गत ४३४४ तलाठी पदांसाठी पदभरती साठी जाहिरात प्रकाशित केली आहे. महाराष्ट्र राज्याचे पदवीधर उम्मीदवर २६ जून २०२३ पासून या पदांसाठी अर्ज करता येणार असून, १८ जुलैपर्यंत ही प्रक्रिया सुरु राहणार आहे. या पदभरतीसाठी आवशयक ती सगळी माहिती तुम्हाला या लेखात मिळेल. तलाठी पदभरती बाबत अधिक माहिती ( शिक्षण, वयोमर्यादा, तलाठी परीक्षा स्वरूप, मागील तलाठी पेपर्स आणि तलाठी सर्व पेपर्स साठी www.talathi.co.in या वेब साईट वर visit करत रहा इथे आम्ही तुमच्यासाठी Ahmednagar Talathi Previous Paper 2016 with answer प्रकाशित करीत आहे
Ahmednagar Talathi Paper 2016
१ नेपाळ,भूतान व चीन या तीन देशांच्या सीमा भारतातील ……..राज्यास भिडल्या आहेत.
(a) मिझोराम (b) नागालैंड (c) सिक्कीम (d) मणिपूर
उत्तर – (c)
२ औष्णिक विद्युतकेंद्रासाठी प्रसिद्ध असलेली “कोराडी” व “खापरखेडा” ही ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात मोडतात ?
(a) चंद्रपूर (b) भंडारा (c) गोंदिया (d) नागपूर
उत्तर – (d)
३ “सलाल परियोजना” कोणत्या राज्यात स्थित आहेत ?
(a) मध्य प्रदेश (b) उत्तराखंड (c) महाराष्ट्र (d) जम्मू आणि काश्मीर
उत्तर – (d)
४ १०३ वे भारतीय विज्ञान कांग्रेस कोठे पार पडले ?
(a) बेंगलोर (b) हैदराबाद (c) मैहसूर (d) जयपुर
उत्तर – (c)
५ “नारंग कप” हे चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
(a) क्रिकेट (b) बॅडमिंटन (c) गोल्फ (d) हॉकी
उत्तर – (b)
६ महाराष्ट्रातील पहिले “महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ” कोठे स्थापन झाले आहे ?
(a) नागपूर (b) औरंगाबाद (c) अहमदनगर (d) पुणे
उत्तर – (a)
७ भारतातील पहिले मुक्त विद्यापीठ कोणत्या शहरात सुरु आहे ?
(a) अहमदाबाद (b) हैदराबाद (c) इंदोर (d) मुंबई
उत्तर – (b)
८ भाभा अणुसंशोधन संस्थेमार्फत संशोधनात्मक अणुभट्टी अप्सराची स्थापना कोणत्या देशाच्या मदतीने करण्यात आली ?
(a) फ्रान्स (b) अमेरिका (c) इंग्लॅन्ड (d) रशिया
उत्तर – (c)
९ “पुंग चोलम” हि लोककला व नृत्य पुढीलपैकी कोणत्या राज्याची आहे ?
(a) मणिपूर (b) आसाम (c) त्रिपुरा (d) मिझोरम
उत्तर – (a)
१० आंतरराष्ट्रीय ओझोन दिन या दिवशी जगामध्ये साजरा केला जातो ?
(a) २१ मार्च (b) ७ एप्रिल (c) ५ जून (d) १६ सितम्बर
उत्तर – (d)
११ चिकुनगुनिया हा रोग …………… होतो.
(a) जीवाणूपासून (b) कबकापासून (c) प्रोटोझोआपासून (d) विषाणूपासून
उत्तर – (d)
१२ एअर फोर्स फ्लाइंग कॉलेज हि संस्था कोणत्या शहरात आहे ?
(a) Coimbatore (b) बंगलोर (c) राजकोट (d) जोधपूर
उत्तर – (d)
१३ “बिंदुसरा” धरण पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
(a) परभणी (b) अहमदनगर (c) बीड (d) नांदेड
उत्तर – (c)
१४ “निब्लिक ” हि संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
(a) गोल्फ (b) नेमबाजी (c) बॅडमिंटन (d) बिलियर्ड
उत्तर -(a)
१५ मॅगसेस पुरस्कार विजेते रजनीकांत आरोळे यांचे गाव व कर्मभूमी ………….. आहे.
(a) पारनेर (b) श्रीरामपूर (c) कर्जत (d) जामखेड
उत्तर – (d)