तलाठी भरती अकोला २०१३ पेपर विषय मराठी
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने, महसूल विभागांतर्गत ४३४४ तलाठी पदांसाठी पदभरती साठी जाहिरात प्रकाशित केली आहे. महाराष्ट्र राज्याचे पदवीधर उम्मीदवर २६ जून २०२३ पासून या पदांसाठी अर्ज करता येणार असून, १८ जुलैपर्यंत ही प्रक्रिया सुरु राहणार आहे. या पदभरतीसाठी आवशयक ती सगळी माहिती तुम्हाला या लेखात मिळेल. तलाठी पदभरती बाबत अधिक माहिती ( शिक्षण, वयोमर्यादा, तलाठी परीक्षा स्वरूप, मागील तलाठी पेपर्स आणि तलाठी सर्व पेपर्स साठी www.talathi.co.in या वेब साईट वर visit करत रहा इथे आम्ही तुमच्यासाठी Akola Talathi Previous Paper 2013 with answer प्रकाशित करीत आहे
१ विध्वंस या शब्दाच्या विरुद्ध शब्द कोणता ?
(a) सौम्यता (b) शांती (c) भांडण (d) सर्जन
२ ‘एत्तेंद्रिय’ म्हणजे काय ?
(a) स्वर्गीय आंबट (b) इंद्रियाच्या जाणीवपेल्याडचा (c) इंद्रियांना आळशी बनविणारा (d) सुखलोलुप
३ खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा ?
(a) अतिथि (b) अतीथी (c) अतिथी (d) आतिथी
४ खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा ?
(a) मतितार्थ (b) मथीतार्थ (c) मातीतार्थ (d) माथीतार्थ
५ पुढील अविकारी शब्द ओळखा ?
(a) त्यांना (b) विशेषण (c) आता (d) चांगला
६ तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो. या वाक्यात कुंभकर्ण हे काय आहे ?
(a)सामान्यनाम (b) विशेषनाम (c) भाववाचक नाम (d) धातुसाधित नाम
७ हरी नापास झाल्यामुळे त्याची छी-थू झाली . या वाक्यात छी-थू हे कोणाचे कार्य करते ?
(a) विशेषण (b) विशेषनाम (c) नाम (d) धातुसाधित नाम
८ खालीलपैकी तृतीय विभक्ती प्रत्यय कोणता ?
(a) आ (b) ही (c) ते (d) ना
९ पुढील वाक्यातील विभक्ती ओळखा. पावसाचा काही भरवसा नाही.
(a) पंचमी (b) षष्ठी (c) सप्तमी (d) अष्टमी
१० बोलकी बाहुली या शब्दातील ‘बोलकी’ हा शब्द काय आहे ?
(a)अव्ययसाधित विशेषण (b) धातुसाधित विशेषण (c) विधी विशेषण (d) सर्वनामसाधित विशेषण
Answers –
1 | 2 | 3 | 4 | 5 | 6 | 7 | 8 | 9 | 10 |
b | a | c | b | c | a | c | b | d | a |