जळगांव तलाठी पेपर २०१४ विषय मराठी
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने, महसूल विभागांतर्गत ४३४४ तलाठी पदांसाठी पदभरती साठी जाहिरात प्रकाशित केली आहे. महाराष्ट्र राज्याचे पदवीधर उम्मीदवर २६ जून २०२३ पासून या पदांसाठी अर्ज करता येणार असून, १८ जुलैपर्यंत ही प्रक्रिया सुरु राहणार आहे. या पदभरतीसाठी आवशयक ती सगळी माहिती तुम्हाला या लेखात मिळेल. तलाठी पदभरती बाबत अधिक माहिती ( शिक्षण, वयोमर्यादा, तलाठी परीक्षा स्वरूप, मागील तलाठी पेपर्स आणि तलाठी सर्व पेपर्स साठी www.talathi.co.in या वेब साईट वर visit करत रहा इथे आम्ही तुमच्यासाठी Jalgaon Talathi Previous Paper 2014 with answer प्रकाशित करीत आहे
१ खालीलपैकी औष्ठ्य व्यंजन कोणते?
(a) प (b) ख (c) ड (d) य
उत्तर – (a)
२ मराठी व्याकरणातील प्रयोगाचे मुख्य प्रकार किती?
(a) दोन (b) तीन (c) चार (d) पाच
उत्तर – (b)
३ खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
(a) उचल्या – लक्ष्मण माने (b) बलुंत – दया पवार
(c)झुलवा – उत्तम बंडू तुपे (d) गोलपीठा – नामदेव ढसाळ
उत्तर – (a)
४ ‘कित्येक’ योग्य संधी फोड ?
(a) किती+येक (b) किती+एक (c) कित्य+एक (d) कित्य+येक
उत्तर – (b)
५ ‘दु:खद मन:स्थितीत सोडलेला दीर्घश्वास’ या शब्दसमुहासाठी योग्य पर्यायी शब्द कोणता?
(a) नि:श्वास (b) शहारा (c) सुस्कारा (d) श्वासोच्छवास
उत्तर – (c)
६ कराळ’ या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय कोणता?
(a) संतापी (b) भांडखोर (c) भीतीप्रद (d) दृष्ट
उत्तर – (c)
७ ‘तिने आता शाळेत जावे’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
(a) सकर्मक कर्तरी (b) अकर्मक कर्तरी (c) सकर्मक भावे (d) अकर्मक भावे
उत्तर – (d)
८ खालील शब्दातील अनेकवचनी शब्द ओळखा.
(a) गळा (b) शाळा (c) मळा (d) बिळ
उत्तर – (b)
९ वक्रतुंड, नीलकंठ, दशमुख या शब्दांचा समास ओळखा.
(a) व्दंव्द (b) बहुव्रीहि (c) कर्मधारय (d) तत्पुरुष
उत्तर – (b)
१० खालीलपैकी कोणता शब्द तत्सम शब्द नाही ते ओळखा.
(a) कर (b) पुष्प (c) अद्यापी (d) आसू
उत्तर – (d)