१ योग्य जोड्या जुळवा.
अ गट ब गट
अ)संधि १)एकत्व किंवा अनेकत्वाचा बोध
ब)उपसर्ग २)नामांचा सर्वनामांचा क्रियापदाशी संबंध
क)वचन ३)दोन शब्दांचा अर्थपूर्ण संयोग
ड)कारकार्थ ३)शब्दाआधी जोडली जाणारी अक्षरे
(a)अ-२, ब-१,क-४,ड-३ (b)अ-३, ब-४,क-१,ड-२
(c)अ-२, ब-३,क-१,ड-२ (d)अ-४, ब-२,क-३,ड-१
उत्तर – (b)
२ ‘आमरण’ या शब्दाचा संदर्भात खालीलपैकी कोणते विधान संपूर्ण बरोबर आहे ?
(a) ‘आमरण’ हा तत्सम शब्द आहे (b)आमरण’ हा तत्सम आणि उपसर्गघटीत शब्द आहे
(c) ‘आमरण’ हा तत्सम उपसर्गघटीत आणि समासघटीत शब्द आहे
(d) वरील तिन्ही विधाने चूक आहते उत्तर – (c)
३. आधुनिक मराठी व्याकरणावरील पुस्त्केद व त्याचे लेखक यांच्या योग्य जोड्या जुळवा.
लेखक पुस्तकांचे नाव
१)विल्यम करी अ) सुगम मराठी व्याकरन
२)दादोबा पांडुरंग तरखडकर ब)शास्त्रीय मराठी व्याकरण
३)मोरो केशव दामले क)महाराष्ट्र भाषेचे व्याकरण
४)मो.रा. वाळिंबे ४)द ग्रामर ऑफ मराठा लग्वेज
(a) अ-३, ब-४,क-२,ड-१ (b) अ-४, ब-३,क-२,ड-१
(c) अ-२, ब-४,क-३,ड-१
(d) अ-१, ब-३,क-२,ड-४ उत्तर – (b)
४ ‘फासा पडेल तो डाव सजा बोलेल टो न्याय’ -या अर्थच्या म्हणीचा विरुद्धार्थी म्हण ओळखा.
(a) पळणाऱ्यास एक वाट आणि शोधणाऱ्यास बारा वाटा (b) ऐकावे जनाचे करावे मनाचे
(c) पिंडी ते ब्रम्हांडी
(d) बडा घर पोकळ वासा उत्तर – (b)
५ खालीलपैकी कोणत्या शब्दातील डा हा अंत्यवर्ण तिरस्कासूचक नाही ?
(a) थेरडा (b)खोटारडा
(c) आखाडा (d)घाणरेडा उत्तर – (c)
६ खालील उभयान्वयी अव्यये व त्यांचे उपप्रकार यांच्या जोड्या जुळवा.
‘अव्यये’ ‘उपप्रकार’
अ)स्वरूपदर्शक १)म्हणून
ब)समुच्चय बोधक २)पण
क)उद्येश दर्शक ३)आणि
ड)न्यूनत्वबोधक ४)म्हणजे
वरीलजोड्यांच्या उत्तराचा योग्य पर्याय निवडा.
(a) अ-४,ब-३,क-१,ड-२ (b) अ-२,ब-४,क-.३,ड-१
(c)अ-४,ब-२,क-१,ड-३ (d)अ-३,ब-१,क-४,ड-२ उत्तर – (a)
७ योग्य जोड्या लावा
‘अ’ गट ‘ब’ गट
क)समोर १)स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय
ख) वारंवार २)कालवाचक क्रियाविशेषण अव्यय
ग)भरपूर ३)परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय
घ)नक्की ४)निश्चदर्शक क्रियाविशेषण अव्यय
(a) क-१, ख-२,ग-३,घ -४ (b) क-३, ख-४,ग-२,घ -१
(c)क-२, ख-१,ग-३,घ -४ (d) क-४, ख-३ ,ग-१,घ -२ उत्तर – (a)
८ जोड्या जुळवा-खालीलपैकी कोणता पर्याय योग्य आहे ?
विभक्ती कारक
अ)द्वितीया १)करण
ब)तृतीया २)अधिकरण
क)चतुर्थी ३)कर्म
ड)सप्तमी ४)संप्रदान
(a) अ-१, ब-२,क-४,ड-३ (b)अ-३, ब-४,क-२,ड-१
(c)अ-३, ब-१,क-२,ड-४ (d) अ-३, ब-४,क-१,ड-२ उत्तर – (c)
९ १)तानाजी लढता लढता मेला
२)आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो.
३)मी रोज सकाळी पहाटे उठतो व एक तासभर शाळेचा अभ्यास करतो
४)मुलांनी वडिलांची आज्ञा पाळावी
अ)विधान नं (१) केवल वाक्याचे उदाहरण आहे .
ब) विधान नं (२) संयुक्त वाक्याचे उदाहरण आहे.
क)विधान नं (३) मिश्र वाक्याचे उदाहरण आहे.
ड)विधान नं (४) आज्ञार्थी वाक्याचे उदाहरण आहे.
(a) फक्त ड चूक (b)फक्त क बरोबर आहे
(c)फक्त अ बरोबर आहे (d) फक्त ब बरोबर आहे उत्तर – (c)
१० योग्य जोड्या जुळवा.
अ)दात दाखवणे १)फजिती होणे
ब)दात वासने २)एखाद्याची खिन्न होवून बसने
क)दात विचकणे ३)नुकसानीमुळे खिन्न होवून बसने
ड)दात पडणे ४)एखाद्याला वेडावणे
(a) अ-२, ब-३,क-४,ड-१ (b) अ-२, ब-३,क-१,ड-४
(c) अ-२, ब-४,क-१,ड-३ (d) अ-१, ब-२,क-३,ड-४ उत्तर – (a)
११ ‘व्यंगार्थ’ वाक्य कोणते ते पर्यायी उत्तरातून अचूक शोधा.
(a) त्याच्या घरावरून गेले, कि मंदिर येते (b) देविकाबाई ‘सुनेला म्हणाल्या सूर्य अस्ताला गेला ‘
(c) घराच्या भिंतीवरून सरपटणारा एक प्राणी म्हणजे पाल
(d) आम्ही फक्त बाजरीचे खातो उत्तर – (b)
१२ विरामचिन्हाचा वापर करताना ‘संयोगचिन्हाचा वापर करण्यात येते’
1)दोन शब्द जोडतात
2)संबोधनाकरिता वापर केला जातो
३)दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षपणे सांगण्यासाठी
४)ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास
(a) अ,ड, बरोबर (b) अ, ब, बरोबर
(c) ब.ड.बरोबर (d) ब बरोबर उत्तर – (a)
१३ खालीलपैकी समानार्थी शब्दाबद्दल चुकीची जोडी शोधा.
(a)घर-सदन, भवन, गृह, आलय (b)चंद्र-इंदू, सुधाकर, हिमांशू, शशी
(c) अमृत-सुधा, पियुष, रस, चिरंजीवी (d) अनल-विस्तव, पावक-अग्नि, वन्ही उत्तर – (c)
१४ खाली दिलेल्या अ व ब गटात अनुक्रमे म्हणी व त्यांचे अर्थ दिले आहेत . मात्र पर्यायी उत्तरांतून एक उत्तर चारही जोडीमध्ये म्हणी व अर्थाच्या दृष्टीने योग्य आहेत ते कोणते ?
‘अ’ ‘ ब’
अ)साखरेचे खाणार त्याला देव देणार १)जेथे लाभ असतो, तेथे लोक जमतात.
ब)साखरेला मुंग्या लागणारच २)नशीबवान माणसाला कोणत्याही गोष्टीची उणीव भासत नाही.
क)सांगी तर सांगी म्हणे वदला वांगी ३)श्रीमती गेली तरी श्रीमंतीची एट जात नाही
ड)सुंभ जळाला, तरी पीळ जात नाही ४)एकदम अशक्य कोटीतल्या गोष्टी करणे
(a) अ-२, ब-३,क-१,ड-४ (b) अ-२, ब-३,क-४,ड-१
(c) अ-४, ब-२,क-३,ड-१ (d) अ-२ , ब-१,क-४,ड-३ उत्तर – (d)
१५ विशेषण या शब्दजातीमध्ये ………….?
(a)सर्व विषशने विकारी असतात (b) विशेषणे नामाचा गुणधर्म सांगतात
(c) विशेषणांना लिंगवचनाचे विकार होतात (d) विशेषणाचा वाक्यात स्वतंत्रपणे उपयोग होतो उत्तर – (c)