Parbhani Talathi Paper Marathi 2013

महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने, महसूल विभागांतर्गत ४३४४ तलाठी पदांसाठी पदभरती साठी जाहिरात प्रकाशित केली आहे. महाराष्ट्र राज्याचे पदवीधर उम्मीदवर २६ जून २०२३ पासून या पदांसाठी अर्ज करता येणार असून, १८ जुलैपर्यंत ही प्रक्रिया सुरु राहणार आहे. या पदभरतीसाठी आवशयक ती सगळी माहिती तुम्हाला या लेखात मिळेल. तलाठी पदभरती बाबत अधिक माहिती ( शिक्षण, वयोमर्यादा, तलाठी परीक्षा स्वरूप, मागील तलाठी पेपर्स आणि तलाठी सर्व पेपर्स साठी www.talathi.co.in या वेब साईट वर visit करत रहा इथे आम्ही तुमच्यासाठी Parbhani Talathi Previous Paper 2013 with answer प्रकाशित करीत आहे

तलाठी भरती परभणी २०१३ पेपर विषय मराठी

१ ‘वर्गात नोटिस फिरवली जाईल’. या वाक्यातील प्रयोग ओळखा.
(a) अकर्मक कर्तरी प्रयोग (b) नवीन कर्मणी प्रयोग (c) भावे प्रयोग (d) कर्तरी प्रयोग

२ ‘मला उद्या गावाला जायचे आहे.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
(a) कर्मणी प्रयोग (b) कर्तरी प्रयोग (c) सकर्मक भावे प्रयोग (d) अकर्मक भावे प्रयोग

३ खालीलपैकी कर्मणी प्रयोग असलेले वाक्य निवडा.
(a) काकणे पुतण्याला वाढवले (b) झाड फुलांनी बहरले (c) तू आता गप्प बसावे (d) डॉक्टरांनी औषधे दिली

४ वाक्यातील ज्या शब्दावरून क्रियेचे स्थान किंवा काळ याचा बोध होतो त्या शब्दाची विभक्ती कोणती ?
(a) षष्ठी (b) चतुर्थी (c) पंचमी (d) सप्तमी

५ ‘आजच मी गावाहून आलो.’ या वाक्यातील विभक्ती ओळखा.
(a) षष्ठी (b) चतुर्थी (c) पंचमी (d) सप्तमी

६ चा,ची,चे, प्रत्यय कोणत्या विभक्तीत येतात ?
(a) षष्ठी (b) चतुर्थी (c) पंचमी (d) सप्तमी

७ ‘सिंह’ या शब्दातील अनुस्वराचा उच्चार ज्या शब्दातील अनुस्वारा-समान होतो, त्या शब्दाचा पर्याय निवडा.
(a) पतंग (b) वंदन (c) श्रीखंड (d) संशय

८ ‘गरजेनुसार’ या शब्दाचा संधीविग्रह खालीलपैकी कोणता ?
(a) गरज + नुसार (b) गरज + अनुसार (c) गरजे + नुसार (d) गरजणू + सार

९ ‘वाक्यपती’ या शब्दाचा संधीविग्रह खालीलपैकी कोणता ?
(a) वाक् + पती (b) वाग् + पति (c) वाक् + पति (d) वाक्य + पति

१० ‘अध: + पतन’ यापासून योग्य शब्द तयार करा.
(a) अधिपतन (b) अधोपतन (c) अधीपतन (d) अध:पतन

Answers –

1 2 3 4 5 6 7 8 9 10
b d d d c a d b b d
                   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *