Talathi Exam Model Question Paper
If you are searching the answer of following questions
Talathi previous year question paper pdf
Talathi question paper 2023
Talathi previous year question paper with answer
Talathi question paper 2019 pdf download
Talathi bharti question paper 2023
Talathi question paper online test
Talathi question paper in marathi
Then you are right place
नमुना प्रश्न
१) खालीलपैकी कोणाचा भारताच्या घटना समितीमध्ये समावेश नव्हता?
१) पंडित जवाहरलाल नेहरू २) बॅ. महमदअली जीना ३) डॉ. बाबासाहेब आंबेडकर ४) डॉ. सच्चिदानंद फिन्हा
२) भारतीय घटनेनुसार _________ सर्वभौस आहे.
१) संसद २) भारतीय जनता ३) न्यायसंस्था ४) कार्यकारी मंडळ
३) “घटनेतील मार्गदर्शक तत्त्वांमधून समान नागरी कायद्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.” हे विधान……
१) संपूर्णत: चूक आहे. २) पूर्णतः बरोबर आहे. ३) विपर्यस्त आहे. ४) संदिग्ध स्वरूपाचे आहे.
४) “घटनेतील कलम ‘कलम ५१ ए’ अनुसार मतदानाचा हक्क बजाविणे हे भारतीय नागरिकाचे मूलभूत कर्तव्य ठरते.” हे विधान……
१) संपूर्णतः चुकीचे आहे. २) पूर्णतः बरोबर आहे. ३) वस्तुस्थितीशी सुसंगत आहे. ४) अंशतः बरोबर आहे.
५) घटनेच्या ७९ व्या कलमानुसार संसदेमध्ये खालील घटकांचा समावेश होतो.
१) लोकसभा २) कार्यकारी मंडळ, लोकसभा व राज्यसभा ३) लोकसभा व राज्यसभा ४) राष्ट्रपती, लोकसभा व राज्यसभा
६) भारतीय घटनेतील सर्वाधिक दुरुस्त्या ______ या कलमाशी संबंधित आहेत.
१) कलम १३ २) कलम १९ ३) कलम ३६८ ४) कलम ३५२
७) खालीलपैकी कोणत्या कलमान्वये आपल्या स्वतःच्याच निर्णयाचे पुनर्विलोकन करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यालायास आहे?
१) कलम १३७ २) कलम १७३ ३) कलम १४२ ४) कलम १७४
८) ______ या संघराज्य प्रदेशात व्दिस्तरीय पंचायतराज पद्धती अस्तित्वात आहे.
१) पुदुच्चेरी २) दादरा व नगर-हवेली ३) दिल्ली ४) चंडिगढ
९) भारतीय संघराज्यात नवीन राज्य सामील करून घेण्याचा, नवीन राज्य प्रस्थापित करण्याचा अथवा राज्यपुनर्रचनेचा अधिकार संसदेस आहे. घटनेच्या कितव्या कलमान्वये हा अधिकार संसदेस प्राप्त झाला आहे?
१) दुसऱ्या २) तिसऱ्या ३) चौथ्या ४) पाचव्या
१०) ________ म्हणजे घटनाकारांचे मन, इच्छा व आकांक्षा जाणून घेण्याची गुरुकिल्लीच होय.
१) घटनेचा मसुदा २) मार्गदर्शक तत्त्वे ३) घटनेचा सरनामा ४) लिखित घटना
११) खालीलपैकी कोणाची नेमणूक करण्याचे अधिकार राष्ट्रपतींस नाहीत?
१) अॅटर्नी जनरल २) कम्प्ट्रोलर अँड ३) राज्यपाल ४) उपराष्ट्रपती
१२) आर्टिकल ______ हे राष्ट्रपतींच्या वटहुकूम काढण्याच्या अधिकाराशी संबंधित आहे.
१) १२३ २) ३६८ ३) ३५२ ४) ३७०
१३) खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
१) दर दोन वर्षांनी राज्यसभेतील एक-तृतीयांश सभासद निवृत्त होतात.
२) दर पाच वर्षांनी राज्यसभेवर नवीन सदस्य निवडून जातात.
३) राज्यसभेचे सभासद हे कायमचे सभासद असतात.
४) राज्यसभेवर सदस्यत्व मिळविण्यासाठी भारताचे नागरिक नसले तरी चालते.
१४) साहित्य, शास्त्र, कला, समाजसेवा इत्यादी क्षेत्रांतील तज्ज्ञांमधून जास्तीत जास्त ______ इतक्या सदस्यांची राष्ट्रपती राज्यसभेवर नियुक्ती करू शकतात.
१) ९ २) १२ ३) २२ ४) ७८
१५) खालीलपैकी कोणती बाब राज्य शासनाच्या उत्पन्नाचे एक साधन आहे?
१) शेतजमिनीवरील वारसाकर २) रेल्वेचे उत्पन्न ३) कस्टम ड्युटी ४) पोस्ट खात्याचे उत्पन्न
१६) खालीलपैकी कोणत्या बाबीचा मूलभूत कर्तव्यांमध्ये समावेश होत नाही?
१) राष्ट्रीय ध्वजाचा मान राखणे २) राष्ट्रगीताचा मान राखणे ३) मतदानाचा हक्क बजावणे ४) सार्वजनिक मालमत्ता सुरक्षित राखणे
१७) भारताच्या लोकसभेमध्ये गणसंख्या गणसंख्या पुरी होण्यास किती टक्के सभासद उपस्थित असणे आवश्यक आहे?
१) २५ टक्के २) १० टक्के ३) २० टक्के ४) ३३ टक्के
१८) भारतीय घटनेचा अर्थ लावताना घटनेतील _______ हा भाग आधारभूत व महत्वाचा ठरतो.
१) घटनेचा सरनामा २) मार्गदर्शक तत्त्वे ३) मूलभूत कर्तव्ये ४) मूलभूत हक्क
१९) राष्ट्रपतींनी मागविलेली माहिती त्यांना देण्याचे पंतप्रधानांचे कर्तव्य घटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये (Article) नमूद केले आहे?
१) ७८ २) ७४ ३) ७५ ४) ७६
२०) प्रतिबंधात्मक स्थानबद्धता कायद्यानुसार एखाद्या व्यक्तीस जास्तीत जास्त ______ इतका काळ स्थानबध्द करता येते.
१) तीन महिने २) एक वर्ष ३) दोन वर्षे ४) सहा महिने
उत्तर :
१) २ २) २ ३) २ ४) १ ५) ४ ६) १ ७) १ ८) २ ९) १ १०) ३
११) ४ १२) १ १३) १ १४) २ १५) १ १६) ३ १७) २ १८) १ १९) १ २०) १
ranjana